Sunday, January 22, 2012

बलिदान







बलिदान तुमचे शंभूराजे
...
जाणारच नव्हते वाया... ,

सह्याद्रीपुत्र सरसावला नव्याने
भगवा घेवून जग जिंकाया !

रक्ताच्या थेंबाने भिजलेली

हि माती गाते गाथा ,

शिवबा पुत्र शेर होता
काळ ही थरथरला होता !

लढा स्वराज्याचा विलक्षण

"सईपुत्र"एकाकी लढला होता ,

भिनलेले बाळकडू रक्तात स्वराज्याचे
जिजामातेनेशेर घडवला होता !

"शिव"सूर्यअस्ताला जाताना

सर्वशक्तीनिशी मोगल संकटदारी

दुफळी माजली स्वराज्यात
तरी नाही हटला माघारी !

खोटे डाग दिले इतिहासाने

"येसु"पतीच्या शुभ्र चारित्र्यावर ,

हि मराठी माती देते साक्ष
होते कुभांड पवित्र धर्मवीरावर!

स्वाभिमानी, गुणी, महापराक्रमी

तेजपुंज वीरपुरुष तो झाला ,

शत्रू समोर उभा ठाकता
जो होवुनी अंगार बरसला !

धर्मासाठी नरक सोसला

बेभान वादळ सह्याद्रीचहोत ,

अमर जाहला धर्मवीर शंभू
पेटवूनी"धर्मज्योत "हृदयात

हिम्मत नव्हती कळीकाळाची

उभी समोर ठाकण्याची ,

खरी निशाणी"शंभूच"आहे

आजही मराठी बाण्याची !

"छत्रपती संभाजी महाराज कि जय..!"

|| संभाजी महाराज ||















|| संभाजी महाराज ||
वयाच्या चौदाव्या वर्षी ज्याने लिहिला बुद्धभूषण ग्रंथ
त्या शेर शिवाच्या छाव्याची अजूनही आहे एक खंत
काय म्हणून आम्हाला इतका बदनाम केलात
पानापानागाणीस एकेके वेगळाच अध्याय जोडलात .
...
लेखी तुमच्या पेशवे होते रसिकतेचे दर्दी
मग आम्हाला का ठरवलात तमाशातली गर्दी
आमच्या इतिहासात का आठवते फक्त गोदावरी
विसरून गेलात कि काय क्रूरकर्म्या औरंग्याची स्वारी.

सल आमच्या मनाची कुणीच का नाही जाणली
जिजाऊ पाठी माया ममतेची कधी कुठे मिळाली
आमच्या हरेक शब्दाचा इथे विपर्यास घेतला आहे
पण हा संभाजी बुर्सेठलेल्यांना पुरून उरला आहे.

मुळात आम्ही मर्द मराठे मावळे ,
नव्हतो कधीच माद्यावरची कावळे
हा अख्खा महाराष्ट्र स्वबळावर आम्ही लढवला आहे
प्रत्येक हम्ल्याला मराठमोळा दणका दिला आहे .

इतिहास्कारहो,
लेखणीला जरा आता तरी आवर घाला
कारण सत्य शेवटी सत्य आहे
अन या छाव्यातून वाहते ते
त्या शूर सिंहाचेच सळसळते रक्त आहे...

पानिपतचा महासंग्राम



१४ जानेवारी १७६१ साली झालेल्या पानिपतच्या महासंग्रामाला २५१ वर्ष पूर्ण झाली...

"लाख बांगडी फुटली , दोन मोती गळाले , २७ मोहरा हरवल्या आणि चिल्लरखुर्दा किती गेला याची गणना नाही ...!!"

युध्दाचे नेतृत्व करणारे "श्री. सदाशिवराव उर्फ भाऊ पेशवे" यांना त्रिवार मानाचा मुजरा...
वयाच्या "१८-२०" वर्षी रणभूमीत पराक़म गाजवणारया "श्री. विश्वासराव पेशवे", "जणकोजी शिँदे" आणि "समशेर बहाद्यर" या "शूर वीरांना त्रिवार मानाचा मुजरा"...

बुर्हाङी घाटात मर्दुमकी गाजवणारया "सरदार दत्ताजी शिँदयांना त्रिवार मानाचा मुजरा"....
शत्रूच्या हत्तीवर स्वार होऊन त्याला मात देणारया "यशवंतराव पवार" यांना त्रिवार मानाचा मुजरा...
"मराठी तोफखाना प्रमुख सरदार भीमराव पानसे" यांना त्रिवार मानाचा मुजरा...
"सरदार गोविंदपंत बुंदेले", "सरदार सिदोजी घाटगे", "सरदार भोईटे", "सरदार पुरंदरेँ" यांना त्रिवार मानाचा मुजरा...!

"धन्याच्या शब्दावर विश्वास ठेऊन आपला संपूर्ण तोफखान्यासह पानिपतला येऊन युध्दाच्या सुरुवातीलाच रोहिले-गिलचे यांचे दाणादाण करुन पळता भुईथोडी करुन आपला फौजफाटा कुरबान करुन भाऊंच्या इमानाला वचनबद्ध राहून,शत्रूच्या अमिषाला झुगारुन प्राणाची आहुती देणारा "इब्राहिम गारदी" व रात्री शत्रूच्या गोटात शिरुन त्याच्या तोफा निकामी करणारा "फत्तेखान" या दोहोँना त्रिवार मानाचा मुजरा...!!!!!!!!!!
युध्दानंतर भाऊसाहेबांच्या पत्नी पार्वतीबाईंना सुखरुप परत आणणारया संताजी वाघ यांना त्रिवार मानाचा मुजरा...!

सुरुवातीच्या काळात रसद पुरवणारया व युध्दानंतर मराठी सैन्याला आश्रय देणारया अलासिंग जाठ या सिख राजाला त्रिवार मानाचा मुजरा...
दुपायपर्यँत युध्दात पराक्रम गाजवून रणभूमीतून परतलेल्या सरदार मल्हारराव होळकर,सरदार विठ्ठल विंचूरकर यांनाही त्रिवार मानाचा मुजरा..!

त्रिवार मानाचा मुजरा ! मानाचा मुजरा !! मानाचा मुजरा !!!