Saturday, June 30, 2012

!!एक दिवसाचा पांडुरंग ..... नक्की वाचा !!

!!एक दिवसाचा पांडुरंग ..... नक्की वाचा !!

"पंढरपूर येथील पांडूरंगाच्या मंदिरात गोकुळ नावाचा भक्त नियमितपणे झाडण्याची सेवा करत होता, तेव्हा त्याच्या मनात विचार आला कि, "विटेवर उभा राहून रोज हजारो लोकांना दर्शन देत असणाऱ्या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत असतील, म्हणून एक दिवस त्याने पांडुरंगाला विचारले, '" देवा तू आमच्यासाठी सारखा उभा असतोस, तुझे पाय दुखत असतील तेव्हा तू आता विश्रांती घे, मी तुझ्या जागी उभे राहण्याची सेवा करेन"

त्यावर पांडुरंग म्हणाला, " ठीक आहे , पण तू इथे उभा राहून कोणालाही काही सांगू नकोस, काहीही झाले तरी बोलू नकोस, फक्त हसत उभा रहा"

पांडुरंगाचे हे बोलणे गोकुळ ने मान्य केले व दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडूरंगाच्या जागी उभा राहिला.

तेव्हा तेथे भक्तांचे येणे सुरु झाले,

श्रीमंत भक्त :- "देवा मी लाखो रुपायांची देणगी दिली आहे, माझ्या व्यवसायामध्ये भरभराट होऊंदे"

(त्यावर तो श्रीमंत भक्त तेथून निघून गेला, पण चुकून तो आपले पैशांनी भरलेले पाकीट तेथेच विसरला, पण देवाने काहीच न करता फक्त उभे राहण्याचे सांगितले असल्याने गोकुळ त्याचे पाकीट त्याला परत देऊ शकला नाही, त्यामुळे तो फक्त हसत उभा राहिला .......... पुढे तेथे एका गरीब भक्ताचे येणे झाले )

गरीब भक्त:- "पांडुरंगा, हा एक रुपया मी तुला अर्पण करतो, माझी हि धनाची सेवा स्वीकार कर. तसेच मला नेहमी तुझ्या चरणाशी ठेव, माझ्याकडून तुझी भरपूर सेवा करून घे....... देवा माझी बायको व मुले २ दिवसांपासून उपाशी आहेत, घरात अन्नाचा कण नाही, माझा सगळा भार मी तुझ्यावर सोडला आहे, जे काही होईल ते तुझ्या इच्छे प्रमाणे होईल असा मला विश्वास आहे"

( असे म्हणून तो भक्त आपले डोळे उघडतो तेव्हा त्याला तिथे पैशांनी भरलेले पाकीट दिसते, तेव्हा देवाचे आभार माणू तो ते पाकीट घेऊन जातो व आपल्या उपाशी बायकोला, मुलांना व इतर गरीब लोकांना अन्न देतो........ गोकुळ काहीच न बोलता हसत उभाच असतो )

पुढे तिथे एक नावाडी येतो, देवाला उद्देशून तो म्हणतो, " हे पांडुरंगा आज मला समुद्रातून खूप लांबचा प्रवास करायचा आहे, तेव्हा सर्व व्यवस्थित होण्यासाठी आशीर्वाद दे "

(असे म्हणून तो नावाडी तेथून जाऊ लागतो तितक्यात तो श्रीमंत भक्त पोलीसांना घेऊन तिथे येतो, तिथे पाकीट नसल्याचे बघून तो श्रीमंत भक्त पोलिसांमार्फत पाकीट चोरल्याच्या संशयावरून नावाड्याला अटक करतो........तेव्हा गोकुळला फार वाईट वाटते पण तो काहीच करू शकत नसल्याने तो फक्त उभा राहतो )

तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो, " पांडुरंगा हा काय खेळ मांडला आहेस, मी काहीच नाही केले तरी मला हि शिक्षा"

(हे ऐकून गोकुळचे हृदय गहिवरते, तो विचार करतो कि स्वताहा पांडुरंग जरी इथे असला असता तरी त्याने काहीतरी केले असते, असे म्हणून न राहवून तो पोलीसांना सांगतो कि, " पाकीट नावाड्याने चोरले नसून गरीब भक्ताने चोरले आहे" ..... त्यावर पोलीस नावाड्याला सोडून देतात, तेव्हा नावाडी न श्रीमंत हे दोघे भक्त देवाचे आभार मानून तेथून निघून जातात.)

रात्री पांडुरंग मंदिरात येतो व गोकुळाला विचारतो "कसा होता दिवस?"

गोकुळ म्हणतो , " पांडुरंगा मला वाटले होते कि इथे उभे राहणे फार सोपे काम आहे, पण आज मला कळाले कि हे काम किती अवघड आहे ते, ह्यावरून कळते कि तुझे दिवस हे सोपे नसतात" ....... पण देवा मी आज एक चांगले काम पण केले, असे म्हणून तो सारी हकीकत देवाला सांगतो.

तेव्हा पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणतो, " शेवटी तू माझ्या आज्ञेचा भंग केलास, तुला मी सांगितले होते कि तू कोणालाही काहीही बोलू नकोस पण तू ऐकले नाहीस, तुझा माझ्यावर (देवावर) विश्वासच नाही........ तुला काय वाटते कि मी भक्तांच्या ह्रुदयातील भावना ओळखू शकत नाही ???" ....... गोकुळ मान खाली घालून उभा राहतो ..........

पांडुरंग पुढे म्हणतो .........

अरे त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतील पैसे हे चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातील होते, आणि त्या पैशांच्या बदल्यात त्याला व्यवसाया मध्ये माझ्याकडून भरभराट हवी होती. त्यामुळे पाकीट हरवण्याचा खेळ मला करावा लागला जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापरून त्याच्या पदरातील पापाचा साठा कमी होणार होता.

त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा एकच रुपया राहिला होता, तरी देखील श्रद्धेने व भक्तीने त्याने मला तो अर्पण केला. म्हणून पैशांचे पाकीट मी त्याला दिले कारण तो सर्व पैसे फक्त गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्याने तसेच केले आहे.

त्या नावाड्याने काहीही चुकीचे केले नव्हते पण तो समुद्रामध्ये लांबच्या प्रवासाला जाणार होता, तेथील वातावरण आज खूप खराब आहे, मोठमोठ्या लाटा जोराने वहात आहेत, ह्या परिस्थितीत तो आपली नाव वाचवू शकला नसता व त्याचा प्राण गेला असता, म्हणून मी त्याला अटक करण्याचा खेळ रचला जेणेकरून तो तुरुंगात बंद राहील व मोठ्या संकटापासून सुटेल.



पण तुला वाटले कि आपण एक दिवसाचा देव झालो म्हणजे आपण सगळे समजू लागलो, पण तू तर सर्व खेळावर पाणी सोडलेस, आणि नेहमी जे होते तेच आजपण झाले ..... "देव मनुष्यासाठी चांगले खेळ रचतो, पण मनुष्याच त्यावर पाणी सोडतो"



तात्पर्य :- देव जे काही करत आहे ते फक्त आपल्या चांगल्यासाठीच करत आहे ...... फक्त आपण देवावर विश्वास ठेवून धीर बाळगला पाहीजे.


जय जय विठ्ठल रखुमाई

जय जय विठ्ठल रखुमाई
पंढरिच्या ह्या देवमंदिरी गजर एक होई
जय जय विठ्ठल रखुमाई
क्षेत्र असे हे परमार्थाचे
पावन जीवन हो पतितांचे
पुंडलीक तो पावन झाला प्रभु-मंगल-पायी
द्वारावतिचे देवकिनंदन
गोरोबास्तव भरती रांजण
विदुराघरच्या कण्या घेतसे श्याम शेषशायी
आसक्तीविण येथे भक्ती
प्रभू नांदतो त्यांच्या चित्ती
चिंतन करता चिरंतनाचे, देव धाव घेई

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा

विठुमाऊली तू माऊली जगाची
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा
काय तुझी माया सांगु शिरीरंगा
संसाराचि पंढरी तू, केली पांडुरंगा
डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा
अमृताची गोडी आज आलीया अभंगा
विठ्ठला मायबापा
अभंगाला जोड टाळचिपळ्यांची
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा
लेकरांची सेवा केलीस तू आई
कसं पांग फेडू, कसं होऊ उतराई
तुझ्या उपकारा जगी तोड नाही
ओवाळीन जीव माझा सावळे विठाई
विठ्ठला पांडुरंगा
जन्मभरी पूजा तुझ्या पाउलांची
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा....

!! अवघे गरजे पंढरपूर !!

पाऊले चालते पंढरीची वाट.....
चंद्रभागेच्या तिरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी
दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरि, तो पहा विटेवरी
जगी प्रगटला तो जगजेठी, आला पुंडलिकाच्या भेटी
पाहुन सेवा खरी, थांबला हरि, तो पहा विटेवरी
!!जय हरि विठ्ठल!!
!!जय हरि विठ्ठल!!
पांडुरंग पांडुरंगएकादशीच ्या सर्वांना शुभेछा...!!!
विठूमाउली आपल्या सर्वाना सुख समृद्धी देवो हीच विठूचरणी प्रार्थना..!!!

Tuesday, June 5, 2012

फ़ोडुनी कोथळा छातीचा


 

फ़ोडुनी कोथळा छातीचा,
मी मान राखला मातीचा.....
षंढ निजवले घावासरशी,
मीच मराठा जातीचा......

समशेरीशी खेळ्लोय मी,
हातात भाले पाळण्यातही....
संकटांचे पहाडही मोठे,
तोडलेय मी खेळण्यातही....

दुरुनही चटका देणारा,
ताप मी जळत्या वातीचा......
षंढ निजवले घावासरशी,
मीच मराठा जातीचा......

निधडी छाती ताव मिशीवर,
फ़ेटा रुळला खांद्यावरती.....
जिथे जोडले गद्दार होते,
वार मी केले सांध्यावरती....

बाजी,दाजी,मुरारबाजी,
तान्हा,जीवा अन संताजी......
रक्त पेरले ज्या मातीवर,
त्या मातीशी नाळ माझी....

दंशण्यास शत्रुस तत्पर,
सर्प मी विलगत्या कातीचा....
षंढ निजवले घावासरशी,
मीच मराठा जातीचा......

शिवसंपत्ती म्हणौन आजवर,
जपला महाराष्ट्र मीच आहे...
नजर ठेवुनी चोरण्यास हा,
शत्रुच माझा नीच आहे...

दंड ठोकुनी वेशीवरती,
रक्षिणार मी राष्ट्र सारा....
जातीपाती नाहीत जेथे,
फ़क्त प्रीतीचा असे पसारा...

जगात झेंडा उंच ज्याचा,
तोच मी मराठा ख्यातीचा.....
षंढ निजवले घावासरशी,
मीच मराठा जातीचा......

फ़ोडुनी कोथळा छातीचा,
मी मान राखला मातीचा.....
--- संतोष वाटपाडे

शककर्ते छत्रपती शिवराय



१६८० साली "शककर्ते छत्रपती शिवराय" यांचे रायगडावर महानिर्वाण झाले. या सह्याद्रीचा सिंह चीरनिद्रेत गेला. पण शिवराय आम्हाला सोडून गेले नाहीत, ते अजूनही आमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात जिवंत आहेत आणि हा चंद्र,सूर्य असे तोवर राहतील..

शककर्ते छत्रपती शिवराय यांना त्यांच्या महानिर्वानादिनी या छोट्याश्या शिवभक्ताकडून मनाचा मुजरा...

छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार |
त्रिवार जयजयकार त्रिवार जयजयकार ||


धर्माचा अभिमानी राजा | देशाचा संरक्षक राजा ||
चारित्र्याचा पालक राजा | घडवी देशोद्धार || १ ||

स्फुर्तीकेंद्र हे भारतीयांचे | दैवत आमुच्या नवतरूणांचे ||
आद्य प्रवर्तक संघटनेचे | सदा विजयी होणार || २ ||

पूजा बांधु सामर्थ्याची | इच्छापूर्ती शिवरायाची ||
उठता उर्मी समर्पणाची | काय उणे पडणार || ३ ||

रात्र भयानक ही वैरयाची | जाणीव होई कर्तव्याची ||
घेऊ प्रतिज्ञा एकजुटीची | नको आता माघार || ४ ||

कितीक झाले आणि होतील | राजे असंख्य जगती ||
परी न शिवबा समान होईल | या अवनीवरती, राजे छत्रपती || ५ ||