छत्रपती सरफोजी राजे भोसले ,तंजावर..!
छत्रपती फक्त लढाया आणि गनिमी काव्यातच तरबेज नव्हते तर विद्येच्या क्षेत्रात ही एका छत्रपती ने अमूल्य अशी कामगिरी केली आहे.दुर्दैवाने ज्ञानार्जानाकडे दुर्लक्ष केलेल्या मराठ्यांनी या पंडित आणि निष्णात वैद्यक अश्या या छत्रपती कडे पण दुर्लक्ष केल आहे.
मोतीबिंदू च्या शस्त्रक्रियेचा शोध फ्रेंच वैद्यक Dr. Jacques Davie यांनी १७५२ साली लावला..
मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ही त्या वेळी एक चमत्कार मानली गेली.याच पद्धतीचा अवलंब करून भारतामध्ये ही काही ब्रिटीश,फ्रेंच नेत्र तज्ञ काम करत होते..
आणि त्या बरोबरच एक भारतीय ही होते ते म्हणजे प्रसिद्ध नेत्र विशारद तंजावर चे महाराजा सरफोजी भोसले (१७७७-१८३२).महा राज हे एक निष्णात वैद्यक होते.महाराज फक्त औषधपचारच करत नव्हते तर चक्क मोतीबिंदूचे शस्त्रक्रिया देखील करत असत.त्या वेळेस photography नव्हती तरी महाराज चित्रकारांकडून पेशंट च्या डोळ्यांची उपचारापूर्वी आणि उपचारानंतर ची चित्रे काढत असत.
सरफोजी महाराजांनी धन्वंतरी महाल बांधला..येथे आयुर्वेद,युनानी यावर संशोधन चाले.महाराजांनी 'सर्बेन्द्र वैद्य मुरेगल'नावाचा वैदक शास्त्रावरील ग्रंथ लिहिला .तीर्थयात्रेला गेल्यावर देखील महाराज आपल्या जवळ वैद्यक उपकरणे घेऊन जात असत.
सरफोजी महाराज स्त्री मुक्तीचे पुरस्कर्ते होते.त्यांनी स्त्री शिक्षकांची नेमणूक केली.सहिष्णू वृत्तीच्या या राजाने कित्येक ख्रिस्चन मिश्नारीच्या शाळांना आणि तंजावर च्या बडे हुसेन दर्ग्याला मदत केली.
संस्कृत ,फ्रेंच, इंग्लिश latin ,Italian ,जर्मन,Danish ,ग्रीक आणि तमिळ,तेलगु कन्नड मराठी भाषा अवगत असणाऱ्या विद्वान अश्या या राजाने
'सरस्वती महाल'नावाचे वाचनालय जगभरातील ग्रन्थ आणून समृद्ध केले.या संग्रहालामध्ये वेदांत,व्याकरण, औषधशास्त्र ,संगीत,नाटक,नृत ्य,स्थापत्य शास्त्र आणि खगोल शास्त्र या विषयांवरील अनेक ग्रंथ तसेच कित्येक नकाशे आणि dictionaries त्यांनी जमवल्या .दक्षिण भारतातील पहिला देवनागरीतील छापखाना महाराजांनी उभा केला.
महाराजांनी'नवविद्या कलानिधी शाळा'बांधली जेथे भाषा,साहित्य आणि विज्ञान यांचा अभ्यास चाले.महाराज Royal Asiatic society चे सदस्य देखील होते.
संगीतामध्ये देखील सरफोजी राजांनी अमूल्य योगदान दिले.'कुमारसंभव चम्पू','मुद्रार ाक्षसछाया',आणि'देवेंद्रकुरुंज ी'या सारखे संगीतावरील ग्रंथ लिहिले.कर्नाटकी संगीता मध्ये clarinet आणि violin चा वापर त्यांनी केला.
महाराजांनी तंजावर पासून जवळच मनोरा इथे शिपयार्ड बांधले.तसेच एक नौदल अभ्यास केंद्र, हवामान संशोधन केंद्र आणि बंदुकीचा कारखाना देखील बांधला.
इतक्या चतुरस्त्र अश्या विद्वान राजा ला दुर्दैवाने महाराष्ट्रात कोणीच ओळखत नाही.इतिहासाच्य ा अभ्यासकांनी याची दाखल घ्यावी हीच अपेक्षा.
कमीत कमी मराठा नावावर संघटना बांधाणारांनी ,राजकारण करणारांनी तरी या राजाची दाखल घ्यावी आणि त्यांना योग्य तो न्याय द्यावा.
छ.शिवराय ,छ.संभाजी आणि राजर्षी शाहून सोबतच हा आणखी एक छत्रपती सर्वांचे स्फूर्ती स्थान ठरावेत हीच अपेक्षा..!
या दुर्लक्षित विद्वान छत्रपतीला शतशः आभार आणि प्रणाम..!
No comments:
Post a Comment