Showing posts with label 1. Show all posts
Showing posts with label 1. Show all posts

Tuesday, September 20, 2011

साखळ दंडाचा जणू चढविला साज...
मृत्यूशी दिली अशी झुंज...वाटली त्याला हि बघा लाज,
अन औरंगजेब चा उतरविला माज..
असे आपले शंभू महाराज.

"मराठी"
१७७८ ते १८०३ पर्यंत, दिल्लीच्या तख्ताला ताब्यात ठेवून मराठ्यांनी लालकिल्यावर जरिपटका फडकवत ठेवला त्या मराठ्यांची मराठी..

महदंबेची मराठी, महाराष्ट्र-धर्म भगव्या जरि-पट्क्यासह, अटकेपार नेण्याचं स्वप्न पाहाणाऱ्या शिवबांची मराठी, ‘मराठीकरणा’च राजकारण करून मतदारांपुढं झोळी पसरणाऱ्या ‘गिधाड-पक्षांची’ मराठी, देशाच्या आíथक राजधानीची.मुंबइची.मराठी.
मायबोली मराठी...
रायगडावर राजधानी ती होती शिवरायांची ।
रायगडावर राजधानी ती होती शिवरायांची ।
कथा सांगतो ऐका तेथील हिरकणी बुरुजाची ।
वसले होते गाव तळाशी वाकुसरे या नावाचे ।
राहात होते कुटुंब तेथे गरीब धनगर गवळ्याचे ।
......आई बायको तान्हा मुलगा कुटुंब होते छोटेसे ।
शोभत होते हिरा नाव त्या तडफदार घरवालीचे ।
सांज सकाळी हिरा जातसे दूध घेऊनी गडावरती ।
चालत होती गुजराण त्या नेकीच्या धंध्यावरती।
एके दिवशी दूध घालिता हिरा क्षणभर विसावली।
ध्यानी आले नाही तिच्या कधी सांज टळूनी गेली।
सूर्यदेव मावळता झाले बंद गडाचे दरवाजे ।
मनात भ्याली हिरा म्हणाली घरी बाळ तान्हे माझे ।
हात जोडूनी करी विनवणी म्हणे जाऊद्या खाली मला।
गडकरी म्हणती नाही आज्ञा शिवरायांची आम्हाला।
बाळाच्या आठवे झाली माय माउली वेडिपीसी ।
कडा उतरूनी धावत जाऊनी बाळाला ती घेइ कुषी।
अतुलनीय हे धाडस पाहुनी महाराज स्तंभित झाले ।
साडी चोळी हिरास देऊनी प्रेमे सन्मानित केले ।
कड्यावरी त्या बुरूज बांधला साक्ष आईच्या प्रेमाची ।
ऐकू येते कथा अजुनी अशी हिरकणी बुरूजाची .............
                                                     जमलंच तर.....करून बघा  
  वाढदिवसाच्या व इतर कोणत्याही शुभेच्छा द्या --- मराठीतूनच...!   भ्रमणध्वनी क्रमांक सांगा --- मराठीतूनच...!   आकडे लिहा ---- मराठीतूनच...!   गाडीचालकाला पत्ता सांगा ---- मराठीतूनच...!   फळवाल्याशी घासाघीस करा ---- मराठीतूनच...!   दारावरची पाटी ---- मराठीतूनच...!   नावाची अद्याक्षरे ---- मराठीतूनच...!   संभाषण आणि नोंदी ----- मराठीतूनच...!   स्वाक्षरी करा ----- केवळ मराठीतूनच...!   आणि   भ्रमणध्वनी वर CALLER TUNE, RINGTONE सुद्धा...... मराठीतूनच...!   मराठीतूनच बोला, ...मराठीतूनच ऎका .....आणि मराठीतूनच ऐकवा..   महाराष्ट्रात राह्यचं असेल तर ’जय महाराष्ट्र’ म्हणा..   मराठी मानुस काय करू शकतो हे विचारण्या पेक्षा, आपण मराठी माणसा साठी काय करू शकतो ह्याचा विचार करा......   मला आहे मराठीची जाण महाराष्ट्रात माझा जन्म झाला हाच मला अभिमान मी मराठी… या दोन शब्दात माझी ओळख आहे.. मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे   पहिला मराठी बाणा - "मोडेल पण वाकणार नाही" आता आमचा मराठी बाणा-"मी वाकणार तर नाहीच पण मोडणारही नाही "   "मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्रधर्म वाढवावा"   मराठीला कधीच कमी समजू नका..! जय महाराष्ट्र.... करा कष्ट..... व्हा श्रेष्ठ...... आणि मराठ्यांचं प्रभुत्व प्रत्येक क्षेत्रात प्रस्तापित करा..   मराठी असल्याचा गर्व आहे.............असलाच पाहिजे..   श्री द ग्रेट मराठा जय भवानी ! जय शिवाजी !!   एक दिवस असा येईल कि हे सारा महाराष्ट्रच बदलून जाईल..... फक्त सुरुवात स्वतःह पासून करा..
पेटलं तेच रक्त शिवबाचं ........!! !

धडधडणाय्रा छातीच अन ........!! !

धारधार पातीच अन .......... !!!
... ...
स्वराज्याच्या मातीच .......... .!!!

कितीही आल्या दिल्लीतून स्वाय्रा .......!!!

तरी मनगटात बळ आहे वाघाचं........!! !

अरे"मराठा आहे मराठा"म्हणावं ........!! !

मोडेल पण वाकणार नाही , हे रक्त आहे मरहट्याच........!! !

शिवरायाच्या मावळ्याच ,.....!!